जिल्हा सामान्य रूग्णालयात जागतिक स्विझ्रोफ्रेनिया दिन साजरा

 जिल्हा सामान्य रूग्णालयात

जागतिक स्विझ्रोफ्रेनिया दिन साजरा

अमरावती, दि. 29 : जिल्हा सामान्य रूग्णालयातील जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जागतिक स्विझ्रोफ्रेनिया दिवसानिमित्य नुकताच जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. प्रमोद निरवणे, डॉ. अमोल गुल्हाने, प्रमोद भक्ते, सुनिल कळतकर, भावना पुरोहित, श्रध्दा हरकंचे, सारा उमर तसेच अधिपरिचारिका श्रीमती अटाळकर, श्रीमती पेंदाम व मानसिक विभागातील प्रशिक्षणार्थी यावेळी उपस्थित  होते. 

             डॉ. अमोल गुल्हाने यांनी उपस्थित रूग्णांना स्विझ्रोफ्रेनिया  या आजाराची लक्षणे व उपाययोजना याबाबत माहिती दिली. तसेच डॉ. प्रमोद निरवणे यांनी  या आजाराबाबत तपासणी व नियमित औषधोपचार घेण्याबाबत रुग्णांना आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रमोद भक्ते यांनी मानले. यावेळी रूग्ण व रूग्णांचे नातेवाईक उपस्थित होते. 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती