Friday, September 30, 2022

सामाजिक न्याय विभागामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिकदिन उत्साहात साजरा विभागीय आयुक्ताच्या हस्ते सामाजिक संस्थांचा गौरव





 सामाजिक न्याय विभागामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिकदिन उत्साहात साजरा

विभागीय आयुक्ताच्या हस्ते सामाजिक संस्थांचा गौरव

 

अमरावती दि.30 (विमाका) : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसाचे औचित्य साधून विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणा-या सामाजिक संस्थांचा सत्कार विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे  यांच्या हस्ते आज करण्यात आला.

साईनगरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या परिसरात हा कार्यक्रम झाला. डॉ.स्वप्निल दुधाट, प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे उपस्थित होते. अनेक वर्षापासून निराधार, निराश्रीत ज्येष्ठ नागरीकांचा सांभाळ करणा-या अनुदानित वृध्दाश्रमांचे अध्यक्ष व सचिवांना गौरविण्यात आले. विभागातील पाचही जिल्ह्यांच्या ज्येष्ठ नागरीक समन्वय समितीचे अध्यक्ष व सचिव यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ नागरीक हे समाजाचे ख-या अर्थाने मार्गदर्शक आहेत. सर्वांनी सकारात्मकता बाळगून उत्साही राहावे. सकारात्मकतेने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते असे डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले. श्री. वारे यांनी ज्येष्ठ नागरीकांसाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. 

 डॉ. दुधाट यांनी वाढत्या वयामुळे ज्येष्ठ नागरीकांना उद्भवणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्यांवर मार्गदर्शन केले. जनसंपर्क अधिकारी मंगला देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा समालकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांनी आभार मानले.  

सहायक आयुक्त माया केदार, प. विदर्भ समन्वय समितीचे श्री. पिंपरकर, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रामकृष्ण कवाने व सर्व पदाधिकारी, सदस्य, वृध्दाश्रमाचे पदाधिकारी, समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

 

नवरात्रौत्सवानिमित्त शनिवारी ध्वनीक्षेपक वापराबाबत सवलत

 

नवरात्रौत्सवानिमित्त शनिवारी ध्वनीक्षेपक वापराबाबत सवलत

 

            अमरावती, दि. 30 : नवरात्रौनिमित्त शनिवारी (1 ऑक्टोबर) ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजतापासून रात्री 12 वाजतापर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.

 

तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी पवनीत कौर यांच्या मान्यतेने अप्पर जिल्हा दंडाधिकारी विवेक घोडके यांनी आज जारी केला. ही सवलत राज्य शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात लागू होणार नाही व ध्वनीमर्यादेचे पालन करणे बंधनकारक आहे. आदेशानुसार, दि. 1 ऑक्टोबर रोजी सभागृहे, मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत वापरासाठी सवलत देण्यात आली आहे.

 

अधिसूचनेची अंमलबजावणी होण्यासाठी ध्वनी प्राधिकरण, पोलीस आयुक्तालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. वर्षातील 14 दिवसांसाठी अशा प्रकारची सवलत यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती.

 

किडनी प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियांबद्दल डॉक्टर व कर्मचा-यांचा गौरव

 








किडनी प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियांबद्दल डॉक्टर व कर्मचा-यांचा गौरव

‘सुपर स्पेशालिटी’तील यंत्रणेचे कार्य कौतुकास्पद

-  विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 

            अमरावती, दि. 30 (विमाका) : किडनी प्रत्यारोपण शस्त्रकियेसाठी बाहेरील यंत्रणेवर अवलंबून न राहता अमरावतीतच स्थानिक तज्ज्ञांच्या सहकार्याने सुसज्ज यंत्रणा विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात निर्माण झाली आहे. हे कौतुकास्पद असल्याचे उद्गार विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे काढले.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातर्फे आतापर्यंत किडनी प्रत्यारोपणाच्या 15 शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. यातील पंधरावी शस्त्रक्रिया बाहेरील टीमची मदत न घेता स्थानिक तज्ज्ञांच्या सहकार्याने यशस्वी झाली. याबद्दल रुग्णालयातील डॉक्टर, स्थानिक तज्ज्ञ, पारिचारिका, परिचर व सर्व कर्मचा-यांचा गौरव विभागीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदाळे, वैद्यकीय अधिक्षक अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. निलेश पाचबुद्धे, डॉ. अविनाश चौधरी, डॉ. राहुल पोटोडे, डॉ. राहुल घुले, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. सुधीर धांडे, डॉ. उमेश अग्रवाल आदी उपस्थित होते. आपल्या मुलाला किडनीदान करून त्याचे प्राण वाचविणा-या किरण अशोक नंदागवळी या मातेचा व यशस्वी शस्त्रक्रियेनंतर घरी परतणा-या सोमेश्वर अशोक नंदागवळी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, किडनी प्रत्यारोपणासाठी स्थानिक स्तरावरच सुसज्ज यंत्रणा निर्माण झाल्याने एक महत्वाचा टप्पा गाठला गेला आहे. रुग्णालयातील स्टाफ व स्थानिक तज्ज्ञांचा समन्वय आणि सहकार्य कौतुकास्पद आहे. याचअनुषंगाने अवयवदानाबाबतही अधिकाधिक जनजागृती व्हावी जेणेकरून गरजू रुग्णांची वेळेत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होऊन त्यांचे प्राण वाचतील.

अमरावतीचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे किडनी प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया करणारे राज्यातील एकमेव शासकीय संदर्भ सेवा रुग्णालय असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. डॉ. सौंदाळे, डॉ. नरोटे यांनीही मनोगत व्यक्त केले.

 

समाजसेवा अधिक्षक सतीश वडनेरकर यांनी सूत्रसंचालन केले.

            यावेळी डॉ. सोनाली चौधरी, डॉ. माधवी कासदेकर, डॉ. नयन चौधरी, डॉ. रेणुका वडदेकर, डॉ. प्रणिता घोणमोडे, डॉ. पूर्णीता वानखडे, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. रोहित हातगावकर, डॉ. स्वाती शिंदीकर, डॉ. जफर अली, डॉ. प्रणित काकडे, डॉ. हितेश गुल्हाने, डॉ. स्वप्नील मोळके, मेट्रन चंदा खोडके, माला सूर्याम, ज्योती काळे, अनिता मडके, कविता बेरड संगीता अष्टीकर, दुर्गा घोडिले, निमा कांडलकर, निकिता बागडे तेजस्विनी वानखडे, आशा बानोडे, अर्चना डोंगर, जमुना मावसकर किरण अष्टेकर, प्राजक्ता देशमुख, यमुना दामले, भारती घुसे, अभिजीत देवधर, सुनीता हरणे, कांचन वाघ, नंदाताई, अविनाश राठोड, आशिष स्थूल, ज्ञानेश लांजेवार, आकाश साळवे, शंकर जारे, गजानन मातकर, सुनीता ठाकूर, जीवन जाधव, सागर गणोरकर, शिवा भोंगाडे,अमोल वाडेकर, पंकज बेलूरकर, विजय मोरे, अंजली दहाट, शीतल बोंडे आदी उपस्थित होते.

 

          ०००

विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावे

 विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर

ऑनलाईन अर्ज सादर करावे

अमरावती दि.30 (विमाका) :  अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणको भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ मिळणेसाठी कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत येत असलेल्या सर्व शासकिय, निमशासकिय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क व इतर योजनेचे शैक्षणिक सत्र 2022-23 या सत्राचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://mahaddimahat.gov.in ही प्रणाली दिनांक 21 सप्टेंबर पासुन कार्यान्वीत झाली असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सुचना आहेत.

जिल्हातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती व इतर योजनेचे सन 2022-23 या सत्रातील तथा नुतनीकरण अर्ज तात्काळ https://mahadbtmahait.gov.in  या ऑनलाईन प्रणालीवर भरण्यात यावे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत अर्ज मरुन महाविद्यालय स्तरावर सादर करावे. यासाठी महाविद्यालयांनी सुचना फलकावर सुचना लावून व वर्गामध्ये नोटीस फिरवून व जनजागृती करुन राये अनुसूचित जमातीचा विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनेपासून वंचित राहील्यास याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधीत महाविद्यालयाची राहील याची नोंद घ्यावी. याबाबत 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळविण्याकरीता https://mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन प्रणालीवर अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी, सावन कुमार यांनी केले आहे.

0000000

आदिवासी शासकीय वसतीगृहाकरीता इमारत भाडे तत्वावर देण्यासाठी ५ ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करावे

 आदिवासी शासकीय वसतीगृहाकरीता इमारत भाडे

तत्वावर देण्यासाठी ५ ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करावे

अमरावती दि.30 (विमाका) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत येत असलेल्या अमरावती येथील आदिवासी मुले/मुलींचे शासकीय वसतीगृह, (विद्यार्थी क्षमता ५००, ३०० व २५० असलेले) विद्यार्थ्यांच्या निवासाकरीता सर्व सोई-सुविधा असलेले म्हणजेच निवासी खोल्या, स्नानगृह, शौचालय उद्यालय, संगणक कक्ष व पाणी पुरठ्याची सोय इत्यादी असलेल्या स्वमालकीच्या इमारती माडे तत्वावर उपलब्ध करुन देण्यास इच्छुक असलेल्या स्थानिक इमारत मालकांकडून भाडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भाडे प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी ता.धारणी जि. अमरावती येथे दि. ५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत सादर करण्यात यावेत, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी कळविले आहे.

००००००

विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावे

 

विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर

ऑनलाईन अर्ज सादर करावे

अमरावती दि.30 (विमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आणि व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येतात.

या योजनांचे अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे नुतनीकरणाचे अर्ज भरण्यास दि.२१ सप्टेंबर, २०२२ पासून महाडीबीटीपोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागाकडून सुरु करण्यात आलेले आहे.

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात विभागातील जिल्हयातील विविध महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षास व नुतनीकरणास प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी वरील योजनांचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शासनाचे https://mahadbtmahait.gov.in हे महाडीबीटी संकेत स्थळ दि.२१ सप्टेंबर, २०२२ पासून कार्यान्वित करण्यात आलेले आहे.

विभागातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील योजनेस पात्र सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी महाडीबीटी संकेत स्थळावर अर्ज भरावे.  विभागातील सर्व महाविद्यालयीन प्राचार्य यांनी आपल्या महाविद्यालयात या योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन महाडीबीटी संकेत स्थळावर भरून घेण्याची तात्काळ कार्यवाही करावी. पात्र मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित प्राचार्य यांनी घ्यावी. असे प्रादेशिक उपायुक्त, सुनिल वारे यांनी कळविले आहे.

०००००००

सामाजिक न्याय विभागामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिकदिन उत्साहात साजरा विभागीय आयुक्ताच्या हस्ते सामाजिक संस्थांचा गौरव

 सामाजिक न्याय विभागामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिकदिन उत्साहात साजरा

विभागीय आयुक्ताच्या हस्ते सामाजिक संस्थांचा गौरव

 

अमरावती दि.30 (विमाका) : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसाचे औचित्य साधून विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणा-या सामाजिक संस्थांचा सत्कार विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे  यांच्या हस्ते आज करण्यात आला.

साईनगरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या परिसरात हा कार्यक्रम झाला. डॉ.स्वप्निल दुधाट, प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे उपस्थित होते. अनेक वर्षापासून निराधार, निराश्रीत ज्येष्ठ नागरीकांचा सांभाळ करणा-या अनुदानित वृध्दाश्रमांचे अध्यक्ष व सचिवांना गौरविण्यात आले. विभागातील पाचही जिल्ह्यांच्या ज्येष्ठ नागरीक समन्वय समितीचे अध्यक्ष व सचिव यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ नागरीक हे समाजाचे ख-या अर्थाने मार्गदर्शक आहेत. सर्वांनी सकारात्मकता बाळगून उत्साही राहावे. सकारात्मकतेने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते असे डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले. श्री. वारे यांनी ज्येष्ठ नागरीकांसाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. 

 डॉ. दुधाट यांनी वाढत्या वयामुळे ज्येष्ठ नागरीकांना उद्भवणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्यांवर मार्गदर्शन केले. जनसंपर्क अधिकारी मंगला देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा समालकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांनी आभार मानले.  

सहायक आयुक्त माया केदार, प. विदर्भ समन्वय समितीचे श्री. पिंपरकर, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रामकृष्ण कवाने व सर्व पदाधिकारी, सदस्य, वृध्दाश्रमाचे पदाधिकारी, समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

 

Thursday, September 29, 2022

नशामुक्ती भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम










 नशामुक्ती भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम

 

अमरावती, दि.29: नशामुक्ती भारत अभियानांतर्गत समाज कल्याण विभागामार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात आले. मादक पदार्थांच्या गैरवापराच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील समाज कार्यमहाविद्यालय, शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृह यांच्या सहभागाने वक्तृत्व, निबंध लिखाण तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करुन यामार्फत जनजागृती करण्यात आली. शिक्षकवृंदांसह विद्यार्थ्यांनी यावेळी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 

00000

सेवा पंधरवड्यानिमित्त अमरावती तहसील कार्यालयातर्फे विविध दाखल्यांचे वितरण

 








सेवा पंधरवड्यानिमित्त अमरावती तहसील

 कार्यालयातर्फे विविध दाखल्यांचे वितरण

 

 

अमरावती, दि. 29 : सेवा पंधरवड्यानिमित्त अमरावती तहसील कार्यालयातर्फे प्रलंबित अर्जांचा गतीने निपटारा करत, विविध दाखले वितरणाचा कार्यक्रम वलगाव येथील सिकची रिसॉर्ट येथे घेण्यात आला. अमरावतीचे तहसीलदार संतोष काकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

 

शासनाच्या 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत  तहसील कार्यालय अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सेवांच्या अनुषंगाने 51 पात्र लाभार्थी यांना सातबारा वितरण,64 लाभार्थ्यांना रेशन कार्ड वितरण,संजय गांधी योजना /विशेष सहाय्य योजनेच्या 24 लाभार्थ्यांना लाभ मंजुरी आदेश वितरण,महावितरण अंतर्गत नवीन वीज पुरवठा लाभार्थी तसेच नावात बदल करण्यात आलेल्या ग्राहकांचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

 

नायब तहसीलदार श्रीमती ठाकरे, निरीक्षण अधिकारी जितेंद्र पाटील,मंडळ अधिकारी राजेश दंडाळे,गावनेर,उगले, जोगी मॅडम,सांगळे मॅडम ,तलाठी पवन राठोड, बाहेकर,पाऊलझगडे मॅडम, भोंबे मॅडम,जाधव मॅडम,कपिले मॅडम व इतर तलाठी,कोतवाल उपस्थित होते.

०००

हेल्पलाईनच्या माध्यमातून सुविधा जेष्ठांच्या आधारासाठी 14567 टोल फ्री क्रमांक

 हेल्पलाईनच्या माध्यमातून सुविधा

जेष्ठांच्या आधारासाठी 14567 टोल फ्री क्रमांक

 

अमरावती, दि.29 : सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकारमार्फत देशातील जेष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवरण्यासाठी सर्व राज्यात 14567 हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहे.

राज्यशासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जनसेवा फाऊंडेशन पुणे व राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये जेष्ठांसाठी ही हेल्पलाईन चालविल्या जाणार आहे. या हेल्पलाईनचा उद्देश जेष्ठ नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करणे असणार आहे. तसेच जेष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, अत्याचारग्रस्त वृध्द व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवांसाठी वेळोवेळी हेल्पलाईनचा उपयोग होणार आहे.

हेल्पलाईन टोल फ्री क्र. 14567 असून हेल्पलाईनची वेळ सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत असणार आहे. हेल्पलाईन केवळ 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर व 1 मे वगळता सर्व दिवस सुरू असणार आहे. हेल्पलाईनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर क्षेत्रिय प्रतिनिधी नियुक्त केलेले आहे. केली आहे. तरी हेल्पलाईनबाबत नागरिकांनी जेष्ठांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

            हेल्पलाईनमार्फत आरोग्य जागृकता, निदान, उच्चार, निवारा, घरे, डे केअर सेंटर, पोषण विषय, जेष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यत्मिक, कला व करमणुक यासंबंधी माहिती दिली जाणार आहे. तसेच कायदेविषयक मार्गदर्शन, विविध प्रश्नांचे निराकरण, पेन्शन संबंधित मार्गदर्शन तसेच शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. क्षेत्रिय पातळीवर बेघर, अत्याचारग्रस्त, हरविलेल्या व्यक्तींची सेवा आणि काळजी घेण्यासाठी हेल्पलाईन कार्यरत राहणार असल्याची माहिती जनसेवा फाउंडेशनच्या मायावती वानखडे यांनी दिली आहे.

Wednesday, September 28, 2022

पदवीधर मतदार संघ निवडणूक सर्व कार्यालयांत कार्यरत पदवीधर कर्मचाऱ्यांनी नोंदणी करुन घ्यावी - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 





पदवीधर मतदार संघ निवडणूक

सर्व कार्यालयांत कार्यरत पदवीधर कर्मचाऱ्यांनी नोंदणी करुन घ्यावी

- विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 

अमरावती, दि. 28 (जिमाका) : अमरावती पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम 1 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. सर्व कार्यालयातील कार्यरत पदवीधरांनी मतदारांनी नोंदणी करुन घ्यावी. ती पूर्ण होण्यासाठी कार्यलय प्रमुखांना प्रयत्न करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे दिले.

 

पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत विविध कार्यालय प्रमुखांची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. उपायुक्त संजय पवार, तहसीलदार वैशाली पाथरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, विभागातील सर्व कार्यालयांनी आपल्या कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची मतदार म्हणून शंभर टक्के नोंदणी करुन घ्यावी. शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी मतदार नोंदणीसाठीचा नमुना 18 विहीत शैक्षणिक पात्रता असल्याचा कागदोपत्री पुराव्यासह कार्यालय प्रमुख यांचेकडे सादर करावा. संबंधित कार्यालय प्रमुख यांनी आवयश्यक वाटेल त्याप्रमाणे कागदोपत्री पुराव्याची पडताळणी करावी. तसेच शासकीय कार्यालयाच्या राजपत्रित प्रमुखांच्या अभिरक्षेतील शासकीय नोंदीच्या आधारे तिसऱ्या अनुसूचितील विहीत नमुन्यामध्ये कार्यालयातील कार्यालय प्रमुख अधिकारी यांनी पदवीधर कर्मचाऱ्यांना दिलेले प्रमाणपत्रासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे एकत्रित अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी सादर करता येईल.

 

 

00000

उद्योग विभाग व ‘सिडबी’तर्फे गुंतवणूक व निर्यातीबाबत कार्यशाळा

 








उद्योग विभाग व ‘सिडबी’तर्फे गुंतवणूक व निर्यातीबाबत कार्यशाळा

कार्यशाळेत दीडशे उद्योजकांचा सहभाग

अमरावती, दि. 28 (जिमाका) : उद्योग व उद्यमशीलता विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेकविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ अधिकाधिक उद्योजक, व्यावसायिकांना मिळावा. विभागातून अधिकाधिक निर्यातक्षम उद्योजक निर्माण व्हावे, यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.  

उद्योग विभाग, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, ‘स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया’(सिडबी) तर्फे अप्पर मुख्य सचिव हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनात गुंतवणूक वृद्धी, निर्यात, व्यवसाय सुलभीकरण (इज ऑफ डुइंग बिझनेस) आणि एक जिल्हा एक उत्पादन याबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा अभियंता भवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, उद्योग सह संचालक गजेंद्र भारती, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुद्दमवार, निर्यातदार उद्योजक संजय जाधव, प्रकाश अहीरराव, कृषी सह संचालक किसनराव मुळे आदी उपस्थित होते.

कार्यशाळेत दीडशेहून अधिक उद्योजक व नव उद्योजकांनी सहभाग घेतला. निर्यातीला चालना देणे, उद्योगांना एक खिडकी योजनेत परवानगी प्राप्त करुन देणे, एक जिल्हा एक उत्पादन आदी विविध योजनांबद्दल या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनीही मार्गदर्शन केले. निर्यात संधीचा विकास करण्यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन मान्यवरांतर्फे करण्यात आले. श्री. जाधव, श्री. पातूरकर, श्री. अहिरराव, श्री. मुळे यांच्यासह विविध तज्ज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले. श्री. भारती यांनी प्रास्ताविक केले. उद्योग निरीक्षक जी.बी. सांगळे यांनी आभार मानले. यानिमित्त अभियंता भवनात निर्यात होणाऱ्या व निर्यातक्षम वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले असून ते उद्या (29 सप्टेंबर ) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.

00000

पारदर्शक प्रशासनासाठी माहिती अधिकार कायदा महत्त्वपूर्ण - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 










पारदर्शक प्रशासनासाठी

माहिती अधिकार कायदा महत्त्वपूर्ण

- विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 

विभागीय आयुक्त कार्यालया माहिती अधिकार दिन साजरा

 

अमरावती, दि. 28 (जिमाका) :* माहिती अधिकार कायदा नागरिकांच्या हितासाठी आहे. प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामाकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने या कायद्याचे महत्त्व वादातीत असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले. 

विभागीय आयुक्त कार्यालयात जागतिक माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. विषय तज्ज्ञ ॲड. राजेंद्र पांडे यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. उपायुक्त संजय पवार, अजय लहाने, गजेंद्र बावणे, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

माहिती अधिकार कायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे जागतिक माहिती अधिकार दिन साजरा करण्यात येतो, असे सांगून डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, भारतीय संविधानाने माहितीच्या अधिकाराची निर्विवादपणे हमी दिली आहे. परंतु ही माहिती मिळविण्यासाठी व्यवहार्य पध्दत म्हणून भारतीय संसदेने माहितीचा अधिकार अधिनियम सुरु केला. यामुळे नागरिकांना शासनाकडून माहिती मिळविणे सोपे झाले आहे.  प्रत्येक भारतीय नागरिकाला माहितीचा अधिकार आहे. सार्वजनिक प्राधिकरणांनी स्वत:हून माहिती खुली करणे कायदेशीर बंधनकारक आहे. माहितीबाबत समाधान न झाल्यास अपीलाचाही अधिकार आहे. परंतु या अधिकाराचा दुरुपयोग होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

विषय तज्ज्ञ डॉ. पांडे यांनी माहितीचा अधिकार याबाबत मार्गदर्शन करताना या कायद्याची महत्त्वाची उद्दिष्टे स्पष्ट केली. माहितीचा अधिकार कायद्यामुळे प्रशासनात पारदर्शकता व विश्वासार्ह वातावरण निर्मितीस मदत होते. हा कायदा प्रशासनाने पाळायचा असून नागरिक यावर लक्ष ठेवतात. यामुळे हा कायदा लोकशाहीस पूरक आहे. हा कायदा व्यापक स्वरुपाचा असून यात शासन व्यवहाराच्या बहूतेक सर्व बाबींचा समावेश आहे. यात शासनाच्या कामकाजाबाबत नागरिकांना माहिती देण्यासंबंधीचे महत्त्वपूर्ण नियम आहेत. शासनाला त्यांच्या कारभारात अधिक उत्तरदायी बनविण्यासाठी आणि शासकीय यंत्रणांवर सनियंत्रण आणि देखरेख ठेवण्यासाठी हा कायदा नागरिकांना अधिक सक्षम बनवितो. 

प्रशासनाने माहितीच्या अधिकारातील कलम चारची माहिती स्वयंप्रेरणेने दिल्यास माहिती अधिकारांच्या तक्रारींची संख्या कमी होईल. यासाठी शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी त्यांच्या कार्यालयाकडील माहितीचे वर्गीकरण करुन ते सूचीबध्द करावे. कार्यालयाची माहिती वेबसाईटवर अथवा कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावी. या कायद्यामुळे नागरिकांचा शासन कारभारातील सहभाग वाढत आहे. माहितीच्या अधिकारात माहिती मागण्यासाठी वयाची अट नसल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखाधिकारी रविंद्र जोगी यांनी केले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

00000

 

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...